FAQ

महा योजना दूत भरती कोणी सुरू केली ?

महा योजना दूत भरती महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे . प्रतेक ग्रामपंचायत मध्ये एक योजना दूत नेमला जाणार आहे.

महायोजना दूत या पदासाठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचे ?

महायोजना दूत या पदासाठी ऑनलाइन अर्ज हे https://mahayojanadoot.org/ या पोर्टल वरती ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.

ऑनलाइन अर्ज कधी पासून करू शकता ?

Maha Yojana Doot Registration | महा योजना दूत नोंदणी

महायोजना दूत या पदासाठी ऑनलाइन अर्ज हे ६ सप्टेंबर २०२४ पासून करायचे आहेत .

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे ?

महायोजना दूत या पदासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम दिनांक १३ सेपटेंबर आहे.

महायोजना दूत या पदासाठी नोंदणी करण्यासाठी शुल्क किती आहे ?

महायोजना दूत या पदासाठी नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरले जात नाही.

महायोजना दूत या पदाचा ऑनलाइन अर्ज भरत असतांना काही अडचण असल्यास हेल्पलाइन क्रमांक काय आहे ?

महा योजना दूत या पदाचा ऑनलाइन अर्ज भरत असतांना अडचण असल्यास ईमेल वरती कॉनटॅक्ट करू शकता.

योजनादूत यांची निवड कशी केली जाईल ?

योजनादूत यांची निवड ग्रामसभेत करण्यात येणार आहे.

किती कालावधी काम मिळणार आहे ?

योजनादूत यांना ६ महीने काम मिळणार आहे.

योजनादूत यांना काय काम करावे लागणार आहे ?

योजनादूत यांना सर्व सरकारी योजणाची माहिती नगरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे लागणार आहे.

शिक्षण काय लागणार आहे ?

योजना दूत या पदासाठी शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी आहे.